रोटेशनप्रमाणे होणार पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:41+5:302021-06-21T04:20:41+5:30
हिंगोली : वीज देयकाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याची वीज तोडली होती. १९ जून रोजी नगर परिषदेने ...

रोटेशनप्रमाणे होणार पाणीपुरवठा सुरू
हिंगोली : वीज देयकाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याची वीज तोडली होती. १९ जून रोजी नगर परिषदेने महावितरणकडे थकबाकीचा भरणा केला आहे. आता सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा रोटेशनप्रमाणे सुरू होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.
मार्चएण्डनंतर वीज देयकाची थकबाकी न भरल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्याची कारवाई महावितरणने केली होती. हिंगोली नगरपालिकेकडे वर्षानुवर्षे असलेली थकबाकी ३३ कोटी रुपयांची आहे. थकबाकीमुळे महावितरणने सिद्धेश्वर येथील पंप व डिग्रस कऱ्हाळे येथील शुद्धीकरण केंद्राची वीज तोडली होती. वीज तोडल्याची माहिती मिळताच नगर परिषदेने १९ जून रोजी २२ लाख ७६ हजार ७७३ रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. थकबाकीचा धनादेश मिळताच महावितरणने पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा सुरू केला आहे. २१ जूनपासून शहरातील पाणीपुरवठा रोटेशनप्रमाणे सुरू होणार असल्याचे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.