शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

औंढा तालुक्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा पाणीटंचाई आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:06 IST

तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे तालुक्यातील १०१ ग्रा.पं.पैकी १२३ गावांत संभाव्य टंचाई

गजानन वाखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया १२३ गावांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना म्हणून २ कोटी ६५ लाख रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुधीर ढोंबरे यांनी दिली. सदरचा आराखडा हा जानेवारी ते जूनपर्यंत दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.औंढा नागनाथ तालुक्यात एकूण १०२ ग्रामपंचायती आहेत. जानेवारी ते मार्चपर्यंतचा टंचाई आराखड्यात १२३ गावांचा समावेश करण्यात आला असून तात्पुरत्या पूरक योजनेत नालेगाव व कुंडकर पिंप्री या दोन गावांचा समावेश केला आहे. यासाठी सात लाख रुपये खर्च नियोजित आहे.तसेच नळ योजना दुरूस्तीअंतर्गत हिवरखेडा, सावळी बु., जोडपिंप्री, पोटा खु., तपोवन, जवळा बाजार, पुरजळ, शिरला, काठोडा, सारंगवाडी, गवळेवाडी, सेंदुरसना, मार्डी, दरेगाव, संघनाईकतांडा, सोनवाडी, येडुत, फुलदाभा, सुकापूर, ब्राह्मणवाडा यासह पुरजळ येथील २० गाव प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजनेच्या दुरूस्तीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेची दुरूस्ती केल्यास परिसरातील २० गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.दरम्यान, विंधन विहिरींच्या विशेष दुरूस्तीसाठी आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीने मागणी केली नसल्याचे समजते. परंतु, नवीन विंधन विहिरींसाठी तब्बल ५५ ग्रा.पं.मधून ७५ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत.यामध्ये उखळी, जलालपूर, उंडेगाव, लांडाळा, दौडगाव, हिवरखेडा, येळी, केळी, पार्डी, सावळी, सावळी बु., सावळी तांडा, जोडपिंप्री, कामठा, अनखळी व वाडी, पेरजाबाद, नारखेडा, पोटा खु, आजसोंडा, असोला ता. औंढा, वडद, काठोडा, काठोडा (त.), चोंढी, शहापूर, नागेशवाडी, शिरडशहापूर, असोला (त.), लाख, लोहरा (बु.), तामटी तांडा, पिंपळदरी- दरेवाडी, येडुत, येहळेगाव, सुरवाडी, फुलदाभा, धारखेडा, पांग्रा (त.), लाख, मेथा महाळसगाव, असोंदा, बोरजा, कुंडकर पिंप्री, तुर्कपिंप्री, अंजनवाडा, अंजनवाडा तांडा, कोंडशी, पाझरतांडा, जांभळी तांडा, दूरचुना, सिद्धेश्वर, वडचुना, नंदगाव, मु. सावंगी, माथा, गांगलवाडी, ब्राह्मणवाडा, गोळेगाव या गावांचा समावेश आहे.गतवर्षी औंढा नागनाथ तालुक्यात पर्जन्यवृष्टी बºयामुळे झाली होती. त्यामुळे पाणीटंचाई उपाययोजने संदर्भात प्रशासनाला जास्त कसरत करावी लागली नव्हती.परंतु, गतवर्षीचा तुलनेमध्ये यंदा तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित करावे लागणार असून उपाययोजनेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.२१ गावांनी केली टँकरची मागणीटँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील उखळी, चिंचोली, रामेश्वर, केळी तांडा, टाकळगव्हाण, राजांळा, सिरला, सिरला तांडा, टाकळखोपा, लक्ष्मण नाईक तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लोहरा बु. व खुर्द, रेवणसिंग तांडा, पवार तांडा, राजापूर, तळणी, पिंपळदरी, देववाडी, सोनवाडी, येहळेगाव या २१ गावांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. तसेच गतवर्षी या गावांपैकी सिरला, टाकळखोपा व संघनाईकतांडा फक्त या तीनच गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तर ५० विहिरी व बोअरचे पाणीटंचाईच्या निवारणार्थ अधिग्रहण करण्यात आले होते.