शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

५३ गावांत पाणीनमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:02 IST

जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.हिंगोली जिल्ह्यात दर महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अणुजीव तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व लघुप्रयोगशाळेकडे पाणी नमुने पाठविण्यात येतात. यात बऱ्याचदा सर्व गावांतील पाणीनमुने घेतले जात नाहीत. त्यामुळे याबाबत सुधारणा होणे अपेक्षित आहे. या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचयातींना सदर स्त्रोताविषयी कळविले जाते. काही ग्रामपंचायती उपाय योजतात. मात्र काही ग्रामपंचायतींकडून त्यावर उपाययोजनाच होत नाहीत. आता उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात दक्षता घेणे गरजेचे आहे.औंढा तालुक्यातील जवळा बाजार, चिंचोली, पोटा बु., ढेगज, भोसी, जांभळी, अंजनवाडी अशा एकूण आठ गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले आहेत. वसमत तालुक्यात पळसगाव, मुरुंबा, हरगाव, इंजनगाव प., चंदनगव्हाण, साखर कारखाना, बोराळा, भेंडेगाव, नहाद, कुडाळा, पुयनी बु., हिडगाव या बारा गावांत, हिंगोली तालुक्यात कोथळज, सावरखेडा, बासंबा, बळसोंड, सायाळा, नवखा, फाळेगाव, देवठाणा, अंबाळा, अंबाळा तांडा, आडगाव, लिंबाळा, माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, वेलतुरा, एकांबा कळमनुरीत येहळेगाव, येगाव, सालेगाव, नांदापूर, येहळेगाव, तेलंगवाडी, कांडली, आडा, बहुर, कुंभारवाडी, येडशी, वाई या १२ गावांत पाणीनमुने दूषित आढळले. तर सेनगाव तालुक्यात जयपूर, कहाकर, वेलतुरा, सिनगी नाका, कारेगाव, वटकळी, सावरखेडा, दाताडा खु., दाताडा बु., पानकनेरगाव या दाहा गावांमध्ये पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे.असे आहे चित्र : तालुकानिहाय स्थितीऔंढा तालुक्यात ६३ पैकी ९, वसमतला ८0 पैकी १२, हिंगोलीत ९0 पैकी २0, कळमनुरीत १0७ पैकी १३, सेनगावात ५१ पैकी १३ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वाधिक २५ टक्के पाणीनमुने सेनगाव तालुक्यात दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तालुक्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वांत जास्त १७ गावांत पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यालाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र दरवर्षीच केवळ कागदी घोडे नाचविले जातात, हा अनुभव आहे.पाणीटंचाई असो वा नसो; शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींना नियमित सूचना दिल्या जातात. मात्र त्यांचे पालन होते की नाही, याची तपासणी कोणीच करत नाही.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य