चार गावांतील विहिरींची पाणी पातळी मोजण्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:33+5:302020-12-29T04:28:33+5:30
कळमनुरी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील चार गावांतील शेतातील विहिरींची पाणीपातळी ...

चार गावांतील विहिरींची पाणी पातळी मोजण्याचे काम पूर्ण
कळमनुरी : पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील चार गावांतील शेतातील विहिरींची पाणीपातळी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित १० गावांतील विहिरींच्या पाण्याची पातळी गावातील जलमित्रांमार्फत मोजली जाणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक भागवत कोटकर यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील जरोडा, शिवनी खुर्द, मसोड, वारंगा मसाई या चार गावांतील माथा ते पायथापर्यंतच्या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजण्याचे काम पूर्ण झाले आहे. एका वर्षातून चारवेळा विहिरींच्या पाण्याची पातळी गावातील जलमित्रांमार्फत मोजली जाणार आहे. गावातील पाण्याची पातळी किती प्रमाणात आहे, याची मोजणी केली जात आहे. त्यानंतरच जलव्यवस्थापनाचे नियोजन केले जाणार आहे. तालुक्यातील जरोडा, वारंगा तर्फ नांदापूर, रामवाडी, शिवनी खुर्द, नवखा, बोल्डावाडी, सिंदगी, कवडा, हिवरा तर्फ जवळा, भुरक्याची वाडी, नांदापूर, मसोड, चिंचोर्डी, सालेगाव या १४ गावांतील जलमित्रांना जल व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कमी पावसामध्ये पीक नियोजन करून पाण्याची बचत कशा प्रकारे करायची व पाणी बचतीचे कोणकोणती साधने वापरायची, याकरिता विहिरींची पाण्याची पातळी मोजली जात आहे.
जलव्यवस्थापन हे प्रशिक्षण वेदांतु या ॲपवर ऑनलाईन घेण्यात आले. चौदा गावांमधून एकूण १५० जणांनी हे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर ११ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत गावातील जलमित्रांनी विहिरीतील पाण्याची पातळी मोजण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले.