कारवाईसाठी आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:51+5:302021-05-20T04:31:51+5:30
निवेदनात म्हटले की, ऑफलाईन पद्धतीने नियतनापेक्षा जास्त १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदळाचा जास्तीचा पुरवठा करण्यात आला. ...

कारवाईसाठी आत्मदहनाचा इशारा
निवेदनात म्हटले की, ऑफलाईन पद्धतीने नियतनापेक्षा जास्त १६ हजार २६७ क्विंटल गहू व तांदळाचा जास्तीचा पुरवठा करण्यात आला. ज्याचे बाजार भाव मूल्य एकूण चार कोटी ६१ लाख २३ हजार रुपये असून, याचा अपहार करून जाणीवपूर्वक पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य लाभापासून वंचित केले. या प्रकरणात यापूर्वीही आंदोलने केली. मात्र, तरीही प्रशासनाने यात कोणतीच कारवाई केली नाही. आता या निवेदनाची दखल न घेतल्यास १ जून रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांच्या दालनात सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जवाबदारी मा. मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित खात्याचे मंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, सर्व शासन व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा विराट लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल व इतरांनी दिला आहे.