मुस्लीम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:09+5:302021-07-05T04:19:09+5:30

हिंगोली : मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ३ जुलै रोजी विराट ...

A warning of agitation for Muslim reservation | मुस्लीम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा

मुस्लीम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा

हिंगोली : मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ३ जुलै रोजी विराट राष्ट्रीय लोकमंचची राज्यस्तरीय बैठक संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृह येथे पार पडली. याप्रसंगी शेख नौमान नवेद नईम, प्रा. फिरोज खान, जिल्हाध्यक्ष तौफिक अहेमद मजीद खान यांची उपस्थिती हाेती. ५ जुलै रोजी मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी जिल्हाभरात धरणे आंदाेलन करण्यात येणार आहे.

मुस्लीम समाजाला यापूर्वी देण्यात आलेले १० टक्के आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष तौफिक अहेमद मजीद खान यांनी आभारप्रदर्शन केले.

Web Title: A warning of agitation for Muslim reservation