शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीसाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरले; पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 19:03 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

- इस्माईल जहागीरदारवसमत : गावठी पिस्तूल व काडतूस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई वसमत तालुक्यातील पळसगाव पाटी जवळ १७ मे रोजी केली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पवन माणिकराव डाखोरे (रा. पळसगाव ता. वसमत), गणेश डिगांबर गुंडाळे (रा. रूपला पांढरी ता. पूर्णा ह.मु. पाटीलनगर वसमत) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक वसमत तालुक्यात गस्त घालत होते. यावेळी तालुक्यातील पळसगाव पाटी येथे दोघेजण गावठी पिस्तूल विक्रीसाठी थांबले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पळसगाव पाटी गाठून पवन डाखोरे व गणेश गुंडाळे यांना ताब्यात घेतले. यावेळी गणेश गुंडाळे यांच्या मदतीने पिस्तूल व काडतूस विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे पवन डाखोरे यांने पोलिसांना सांगितले. त्याने कमरेला लावलेले एक गावठी पिस्तूल व बॅरेलमधील एक जिवंत काडतूस असा ४२ हजारांचा मुद्देमाल काढून दिला. या प्रकरणी दोघांविरूद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दरोड्याचे दोन गुन्हे दाखलयातील पवन डाखोरे याचेवर नांदेड जिल्ह्यात दरोड्याचे दोन गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार पांडुरंग राठोड, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली