वाकोडीत आठ जणांना जुगार खेळताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:41+5:302021-07-15T04:21:41+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्याविरुद्धच्या मोहिमेत ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पोटे, सहायक ...

In Wakodi, eight people were caught gambling | वाकोडीत आठ जणांना जुगार खेळताना पकडले

वाकोडीत आठ जणांना जुगार खेळताना पकडले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंद्याविरुद्धच्या मोहिमेत ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार पोटे, सहायक फौजदार बोके, जाधव, ठाकूर, टापरे, पायघन, पाटील यांच्यासह संभाजी लेकुळे यांनी हा छापा मारला. वाकोडी येथे दिलीप काकडे यांच्या घराशेजारी जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती या पथकास मिळाली होती. त्यावरून दोन पंचांना सोबत घेऊन छापा मारला. या ठिकाणी दिलीप हरिभाऊ काकडे, गणेश नथ्थूजी काकडे, तुकाराम रंभाजी इंगळे, मारोती केशवराव जाधव, डिगांबर धोंडबा नेवरकर, विश्वनाथ किशनराव राऊत, सुधाकर नारायण साखरे, अशोक शंकर थोरात हे गोलाकार बसून झन्ना-मन्ना हा जुगार पैसे लावून खेळत होते. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत संभाजी लेकुळे यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: In Wakodi, eight people were caught gambling