व्हायरल सर्दी, तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:39+5:302021-09-09T04:36:39+5:30
हिंगोली: कोरोना महामारीचे संकट कायम असतानाच १ ते १४ वयोगटांमधील लहान मुलांमध्ये व्हायरल, सर्दी, खोकला, ताप आदींचे प्रमाण वाढले ...

व्हायरल सर्दी, तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी !
हिंगोली: कोरोना महामारीचे संकट कायम असतानाच १ ते १४ वयोगटांमधील लहान मुलांमध्ये व्हायरल, सर्दी, खोकला, ताप आदींचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयातील बालविभागात रोज चार ते पाच रुग्ण दाखल होऊन उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात येत आहे.
दोन ते तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. २९ ऑगस्टला व्हायरल फिव्हर २९, चिकनगुनिया २४, टाईफाईड व काविळ ४ अशा एकूण ४९ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वॉर्ड क्र. ४ या बालकांच्या विभागामध्ये साथीच्या आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. ४ सप्टेंबरला ६, ५ सप्टेंबरला १०, ६ सप्टेंबरला १२, ७ सप्टेंबरला १२ आणि ८ सप्टेंबरला ३ रुग्ण सर्दी, खोकला, तापीचे दाखल करून घेण्यात आले.
उपचार करून सोडून दिले जाते...
व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये रोजच वाढत होत आहे. दाखल रुग्णांवर तातडीने उपचार केले जात असून त्यांना बरे वाटत असल्यास घरीही सोडून देण्यात येत आहे, अशी माहिती बालविभागातून देण्यात आली.
५ दिवसांत ४३ रुग्ण दाखलमागच्या तीन आठवड्यांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. याचबरोबर पावसाचेही प्रमाण वाढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, डोके दुखणे आदी आजारांचे रुग्ण रुग्ण दाखल होत आहेत. पाच दिवसांमध्ये ४३ रुग्ण जिल्हा रुग्णालयातील बाल विभागात दाखल झाल्याची नोंद झाली आहे.
पाणी उकळून प्यावे...
लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे आदी प्रकार आढळून आल्यास उशीर न लावता जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे. ताप, सर्दी अंगावर काढू नये. फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पालकांनी मुलांची काळजी घ्यावी...
गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. लहान मुलांची काळजी घेत त्यांना बाहेर जाऊ दे नये. तसेच बाहेरचे पदार्थ मुलांना देऊ नयेत. रोजच्या रोज लहान मुुलांना पाणी उकळून पाजावे. घराच्या आसपास पाण्याची डबके असतील तर ती जागा स्वच्छ करावी. मुलांची काळजी घ्यावी.
- डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ