शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

हिंगोलीत अतिक्रमण काढताना वाद; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:40 AM

येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर स्वच्छता विभागातील महिला कर्मचाºयास मारहाण झाली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देहिंगोलीत मोहीम जोरात : शासकीय कामात अडथळा केल्याने तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर स्वच्छता विभागातील महिला कर्मचाºयास मारहाण झाली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.हिंगोली शहरातील अतिक्रण हटविण्यास पालिकेने मंगळवारपासून सुरूवात केली आहे. न. प. चे मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणा पोलीस बंदोबस्तात हिंगोली बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढून घेत होती. अतिक्रमण काढताना यावेळी काही अतिक्रमणधारकांनी वाद घालत पालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाºयांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच मारहाण केल्याने काही महिला कर्मचाºयांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नगर अभियंता मनीष राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र दुबे, तसेच त्यांच्या पत्नी व मुलीविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील नगर परिषद हद्दीतील बिरसा मुंडा चौक, देवडानगर, एनटीसी, औंढा रोड, बसस्थानक, महावितरण कार्यालय, इंदिरा गांधीचौक, महेश चौक, महावीर चौक, आंबेडकर चौक, रेल्वेस्टेशन रोड, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, टपाल कार्यालय रोड, अष्टविनायक चौक, खुराणा पेट्रोल पंपाजवळील परिसर, जवाहर रोड, भाजीमंडई, पलटण मस्जीद, अकोला रोड, पिपल्स बँक परिसर, न्यायालयासमोर, पलटण पाण्याची टाकीजवळील, रिसाला नाका व शहरातील मुख्य रस्त्यालगतचे तसेच इतर प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जाणार आहे.प्रतिसाद नाही... अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावीत याबाबत पालिकेने यापूर्वीच सूचनाही दिल्या होत्या. परंतु अनेकांनी अतिक्रमण काढूनच घेतली नाही. त्यामुळे आज अतिक्रमण काढताना वाद झाला. छोट्या टपरीधारक व्यापाºयांना उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे छोटी दुकाने व हॉटेल आहेत. त्यामुळे काही व्यापारी अतिक्रमण काढण्यास विरोध करीत आहेत. परंतु अतिक्रमणांमुळे शहरातील वाहतुकी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने ती काढून घेतली जात आहेत.उपचार : अधिकारी-कर्मचाºयांना शिवीगाळनगर परिषदेच्या महिला सफाई कामगार धु्रपता तुकाराम हतागळे, साधना खडसे व गंगाबाई गायकवाड यांना रवींद्र दुबे, त्याची पत्नी व मुलीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केला. न.प. हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेत पहिल्याच दिवशी वाद उफाळला. यावेळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कोणाची गय न केल्याने इतरांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.