सैन्यदलात कर्तव्यपूर्ती केलेल्या बाळापूरच्या भूमिपुत्राचा ग्रामस्थांकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:34+5:302021-02-15T04:26:34+5:30

आखाडा बाळापूर : भारतीय सैन्य दलात १७ वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेल्या बाळापूरच्या भूमिपुत्राचा परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी ...

Villagers felicitate Bhumiputra of Balapur who has done his duty in the army | सैन्यदलात कर्तव्यपूर्ती केलेल्या बाळापूरच्या भूमिपुत्राचा ग्रामस्थांकडून सत्कार

सैन्यदलात कर्तव्यपूर्ती केलेल्या बाळापूरच्या भूमिपुत्राचा ग्रामस्थांकडून सत्कार

आखाडा बाळापूर : भारतीय सैन्य दलात १७ वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेल्या बाळापूरच्या भूमिपुत्राचा परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व ग्रामस्थांनी सत्कार केला. या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आखाडा बाळापूर येथील सिद्धार्थ पांढरे यांनी भारतीय सैन्यदलात विविध ठिकाणी सेवा बजावली. पुणे याठिकाणी सेवा बजावून अखेर गुजरातच्या सीमेवरून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या कर्तव्यपूर्तीचा सोहळा बाळापूरच्या नागरिकांनी साजरा केला. येथील कुसुमताई चव्हाण सभागृहात १४ फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी जवानांच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जक्की कुरेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोढारे, विजय बोढारे, सोपान बोढारे, सभापती दत्ता पाटील, फारुख गिरगावकर, एस. टी. हेंद्रे, संभाजीराव पंडित, जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे, शहबाज कुरेशी, गुफ्रान कुरेशी, यशवंत नरवाडे, यशवंत पंडित, माणिक पंडित उपस्थित होते. यावेळी पांढरे यांनीही भावनिक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पंडित यांनी केले तर एन. जी. पंडित यांनी आभार मानले. फाेटाे नं. १४

Web Title: Villagers felicitate Bhumiputra of Balapur who has done his duty in the army