प्रवेशद्वारासमोर वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:28+5:302021-02-05T07:53:28+5:30
रांगोळी काढून व्हरांडा सजविला हिंगोली: येथील जिल्हा परिषदेच्या तळ व पहिला मजल्यावरील विविध कार्यालयांसमोर आकर्षक रांगोळी काढून शोभिवंत झाडे ...

प्रवेशद्वारासमोर वाहने
रांगोळी काढून व्हरांडा सजविला
हिंगोली: येथील जिल्हा परिषदेच्या तळ व पहिला मजल्यावरील विविध कार्यालयांसमोर आकर्षक रांगोळी काढून शोभिवंत झाडे ठेवण्यात आली आहेत. पालकमंत्री वर्षा गायकवाड या जिल्हा परिषदेमध्ये येणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
झाडांना पाणी देण्याची गरज
हिंगोली : शहरात नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. बहुतांश परिसर स्वच्छ ठेवण्यात नगरपालिकेला यश आले आहे. तसेच परिसरात झाडे लावून जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहरातील रस्तेही हिरवेगार दिसत आहेत. मात्र, अनेक ठिकाणची झाडे सुकत असून या झाडांना नियमित पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण वाढले
हिंगोली : येथील बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे. यासाठी जवळच तात्पुरता प्रवासी निवारा बनविण्यात आला आहे. बसेस लावण्यासाठी गिट्टी व मुरूम टाकून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता बसेसमुळे गिट्टी वर आली आहे. ही गिट्टी बसच्या चाकाखाली येऊन प्रवाशांना लागत आहे.
दारुड्यांचा बंदोबस्त करा
हिंगोली : येथील बसस्थानक परिसरात दारुड्यांचा वावर वाढला आहे. येथे दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, दारुड्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध दारू विक्रीमुळे कुठेही देशी दारू मिळत असल्यानेच दारुड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे लक्ष देवून दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.