पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहन संघटना चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:42 AM2021-02-26T04:42:44+5:302021-02-26T04:42:44+5:30

हिंगोली : मागील तीन महिन्यांपासून पेट्रोलच्या व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक चिंताग्रस्त झाले असून घर ...

Vehicle associations worried over petrol, diesel price hike | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहन संघटना चिंताग्रस्त

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने वाहन संघटना चिंताग्रस्त

Next

हिंगोली : मागील तीन महिन्यांपासून पेट्रोलच्या व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक चिंताग्रस्त झाले असून घर कसे चालवावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. दरवाढ संदर्भात वाहन संघटनांनी बैठक घेऊन पुढील दिशा बैठकीत ठरविली.

२४ फेब्रुवारी रोजी शहरातील स्कूल व्हॅन, लोडिंग संघटना, मार्केट गाडी टुडेस संघटना आदी संघटनांनी बैठक घेतली. यावेळी पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराबाबत चिंतन करण्यात आले. मागील तीन महिन्यांपासून दररोज तेलाचे दर वाढत असल्यामुळे वाहन बाहेर काढावे की नाही ? असा प्रश्न पडला आहे. बहुतांश वाहनचालक हे विद्यार्थ्यांना शाळेत सोडणारे आहेत. केंद्र व राज्य शासनाने याचा विचार करुन तेलाच्या दराचे दर कमी करावेत, अशी एकमुखी मागणी वाहन संघटनांनी केली. २५ फेब्रुवारी रोजी शहरात पेट्रोलचा दर ९८ रुपये २० पैसे तर डिझेलचा ८७.९६ पैसे एवढा दर होता.

या बैठकीस मुरलीधर कल्याणकर, सुभाष झाडे पाटील, संतोष पाटील, विनोद रणखांब, गजानन घुगे, सुनील कांबळे, बबन आडकिने,रवींद्र कांबळे, रमेश खंदारे, सोपान बर्डे, अनिल सानप, गजानन काळे, भगवान बांगर, उतम हरण, सुधाकर नागरे, सिकंदरभाई, रफीकभाई,कैलास गुंगे, पांडुरंगमामा, राजू मेजर, पांडुरंग कऱ्हाळे, गमाजीद पठाण, बद्री घुगे, बजरंग चांदणे, राजू जगताप, सीताराम जगताप, कुलकर्णीमामा, राजू घुगे, सुरेश पडोळे आदींची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Vehicle associations worried over petrol, diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.