शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गावात दारू विक्री बंद करावी यासाठी चक्क ‘वीरूगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 05:37 IST

युवकाने केला मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

अरुण चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क  जवळाबाजार (जि. हिंगाेली) : औंढा तालुक्यातील कोंडशी  गावात तातडीने दारू बंदी करण्यात यावी यासाठी एका युवकाने मोबाइल टॉवरवर चढून ‘वीरूगिरी’ करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या ‘वीरूगिरी’ करणाऱ्या युवकाला खाली उतरविले. कोंडशी गावात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका युवकाने  मोबाइल टॉवरवर चढून गावात सुरू असलेली दारू विक्री बंद   होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा निर्णय करत टॉवरवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. पाहता पाहता कोंडशी गावातील नागरिक टॉवरजवळ जमा झाले. 

मागच्या अनेक महिन्यांपासून कोंडशी  गावामध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.  हे पाहून गणेश हरिभाऊ गायकवाड (४२)  याने गावातील एका मोबाइल टॉवरवर चढून जोपर्यंत गावामध्ये दारू विक्री बंद  होत नाही तोपर्यंत खाली उतरायचे नाही, तसेच वेळप्रसंगीवरूनच उडी मारण्याचा चंग बांधला होता.  यावेळी गावात चिंतेचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी तत्काळ  हट्टा पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर जवळाबाजार चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, जमादार भुजंग कोकरे, सुरेश भारशंकर, पाईकराव यांच्यासह इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल  झाले. 

‘शोले’ चित्रपटाची झाली आठवण...दारूबंदी तातडीने करण्यात यावी, युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यात यावे यासाठी टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोंडशी गावातील युवकाने ‘वीरूगिरी’ करत केला. ज्यांनी ‘शोले’ चित्रपट पाहिला ते मात्र यावेळी म्हणत होते ‘आता काही खरे नाही, आपला ‘वीरू’ दारूबंदी नक्की करणार.

टॉवरवर चढलेल्या युवकाचे समुपदेशन करून पोलिसांनी त्याला खाली उतरविले. त्यावेळी कुठे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दारूबंदीबाबत गावामध्ये लवकरच बैठक घेऊन दारू विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी गावकऱ्यांना दिले. 

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गावात फिरकत नसल्यामुळे दारू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली आहे. परिणामी, व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढू लागले असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीliquor banदारूबंदी