‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:37+5:302021-09-09T04:36:37+5:30
हिंगोली : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा ...

‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ उपक्रम
हिंगोली : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन उपक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरचं घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जात घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे.
- या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाईन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. यामध्ये १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील.