ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:55+5:302020-12-29T04:28:55+5:30
कुरुंदा : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजल्याने प्रचार यंत्रणेचा जाेर वाढला आहे. अनेकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर ...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर
कुरुंदा : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजल्याने प्रचार यंत्रणेचा जाेर वाढला आहे. अनेकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते. विविध प्रकारच्या राजकीय पोस्ट शेअर करून वातावरण निर्मिती केली जात आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.
कुरुंदा व परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने कार्यकर्त्यांची पॅनेल प्रमुखांकडून जुळवाजुळव करण्यात येत आहे. खर्च करणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत पुढे केले जात आहे. तसेच विविध राजकीय समीकरणे बांधून अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात येत आहे. तसेच पॅनेलमध्ये उभे असलेल्या उमेदवारांची नावे तसेच भावी सरपंच यासह विविध आशयाच्या पाेस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. निवडणूक जवळ येत असताना चुरसही वाढत आहे.