दुचाकीचालकांत तरुणांचे प्रमाण मोठे बनले आहे. आता एकेका घरातच तीन ते चार दुचाकी दिसू लागल्या आहेत. मानवी जीवनाचा वाढता वेग या दुचाकींवरच आल्याचे चित्र आहे. मात्र या दुचाकींचा कधी काय ट्रेंड येईल सांगता येत नाही. सध्या दुचाकीचे आरसे काढण्याचा जीवघेणा प्रकार समोर येत आहे. अपघातात तुटून नुकसान झाले तर समजता येईल. मात्र अनेक नव्या कोऱ्या दुचाकींचेही आरसे काढून टाकल्याचे दिसून येते.
आरसा नाही म्हणून २०० रु. दंड
दुचाकींना आरसा नसल्यास दंड आकारला जावू शकतो, हेच अनेकांना माहिती नाही. वाहतूक शाखेने जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या काळात १३४७ वाहनांना २ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दुचाकीचालकांना हे बंधनकारक
दुचाकीचालकांनी आपल्या वाहनाच्या मूळ रचनेत बदल करता येत नाही. सायलेंसर बदलणे गैरकायदेशीर आहे. तर साईड ग्लास, इंडिकेटर असणेही आवश्यक आहे. मात्र अनेकांना हे माहितीच नसते.
दुचाकींचे आरसे काढून ती चालविणे ही गंभीर बाब आहे. मागून येणारे वाहन कळण्यासाठी, ओव्हरटेक करताना हे आरसे मोलाची भूमिका बजावतात. त्यामुळे ते काढले नाही पाहिजे. तसे आढळले तर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाईची मोहीम राबविली जाईल.
- ओमकांत चिंचोलकर, सपोनि, वाहतूक शाखा