कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:58+5:302021-04-18T04:28:58+5:30

या प्रकरणी सदाशिव रामराव सोनवणे (रा.जवळा बाजार) यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदाशिव सोनवणे ...

Two-wheeler injured in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

या प्रकरणी सदाशिव रामराव सोनवणे (रा.जवळा बाजार) यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदाशिव सोनवणे व एक जण एमएच ३८ एए ०१९४ ही दुचाकी लावून लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. याच वेळी एमएच १९ बीव्ही ३५५२ च्या कारचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून सदाशिव सोनवणे यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. त्यानुसार, १६ एप्रिल रेाजी हिंगोली शहरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करताना एक जण आढळून आला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler injured in car crash