दुचाकीला ऑटोरिक्षाची धडक, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:45+5:302021-03-24T04:27:45+5:30
बोल्डा फाटा ते सिंदगी रोडवरून शिवदास रणखांब जात असताना त्यांच्या दुचाकीला एम एच ४४. ४३४९ च्या ऑटोरिक्षा चालकाने वाहन ...

दुचाकीला ऑटोरिक्षाची धडक, दोघे जखमी
बोल्डा फाटा ते सिंदगी रोडवरून शिवदास रणखांब जात असताना त्यांच्या दुचाकीला एम एच ४४. ४३४९ च्या ऑटोरिक्षा चालकाने वाहन भरधाव चालवून दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये शिवदास रणखांब यांच्या भावाच्या पायाला फॅक्चर झाले आहे. तसेच शिवदास यांना मुक्कामार लागला. याप्रकरणी ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
२० लिटर दारू जप्त
हिंगोली : जिल्ह्यात पोलिसांचे दुर्लक्ष होताच अवैध धंदे चालकांचे फावले आहे. याचा फायदा घेत अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी दारू विक्री सुरू केली आहे. अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कळमनुरी, आखाडा बाळापूर, सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत चार ठिकाणी पोलिसांनी छापा मारून आरोपींकडून ४ हजार ९६० रूपयांची २०.४२ लिटर दारू जप्त केली आहे. याप्रकरणी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.