दोन खासगी मालमत्ता न.प.ने केल्या सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:12+5:302021-03-25T04:28:12+5:30
औद्योगिक वसाहत, अकोला रोड येथील बनवारीलाल माधवलाल बगडीया यांचे सर्व्हे नं. १९, २० मधील प्लाॅट नं. सी-३, सी-४ ...

दोन खासगी मालमत्ता न.प.ने केल्या सील
औद्योगिक वसाहत, अकोला रोड येथील बनवारीलाल माधवलाल बगडीया यांचे सर्व्हे नं. १९, २० मधील प्लाॅट नं. सी-३, सी-४ यांच्याकडे मालमत्ता कराची थकबाकीसह चालू वर्षाची ६९ हजार १७४ रुपये थकबाकी आहे. त्यामुळे त्यांना वारंवार थकितकराची रक्कम भरण्याची सूचना देऊनही त्यांच्याकडून कर न भरण्यात आला. यामुळे २४ मार्चरोजी हिंगोली न.प.चे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, शाम माळवटकर, काकडे, पुतळे, गजानन बांगर, पंडित मस्के, शकिल हाश्मी, नितीन पवार आदींनी मालमत्तेला सील ठोकले. शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह खासगी मालमत्ताधारकांना मालमत्ता व पाणीपट्टीचे थकीत रकमेसह चालू वर्षाचे कर भरावे नसता न.प.कडून कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.