शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:16 IST

शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टँकर १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला आहे.

हिंगोली : शहरालगत असलेल्या गारमाळ परिसरातील मुख्य महामार्गावर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टँकर १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकरचालक जागीच ठार झाला आहे.शहरालगतच्या खटकाळी बायपास भागात नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. सोमवारी दुपारी १२.३० वाजता वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि टँकर या दोन्ही वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला. अपघात एवढा मोठा होता की, मयत वाहनचालक ३० ते ४० फूट फरफरटत गेल्याने त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रूग्ण्वाहिकेद्वारे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मयताची ओळख पटली नसून नसून ती पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.घटनास्थळी हिंगोली शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तत्काळ पोहचले. यावेळी वाहतूक सुरळीत करून काही वेळात रस्ता मोकळा करून दिला. घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे करीत आहेत.अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठारकनेरगाव नाका, जि. हिंगोली : कनेरगाव हिंगोली राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च च्या रात्री घडली आहे. रात्री अपघात झाल्यानंतर मृतदेह रात्रभर रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. सकाळी घटना लक्षात आली. हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील पांडुरंग किसन जाधव (३५) असे अपघातातील मृताचे नाव आहे. मयत पांडुरंग जाधव हे कनेरगाव नाका येथील बुलडाणा अर्बन बँकेत गोदाम लिपिक या पदावर कार्यरत होते. ३१ मार्च रोजी बँकेचे कामकाज आटोपून रात्री १० वाजता दुचाकी क्र. एम.एच. ३८ एल. ६८४० ने गावाकडे निघाले. कनेरगाव-फाळेगावच्या दरम्यान हिंगोलीकडून येणाऱ्या अज्ञात वहानाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने पांडुरंग जाधव हे रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा रात्रीच मृत्यू झाला. अपघातातील दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर मृतदेह रात्रभर बाजूच्या खड्ड्यामध्ये रात्रभर पडून होता. सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मयताची ओळख पटविली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी हिंगोली ग्रामीणचे पोउपनि पोटे, बीट जमादार राजेश ठोके, बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक संचेती, कनेरगाव नाका शाखेचे तोष्णीवाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस