गोठ्याला आग लागून दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:02+5:302020-12-26T04:24:02+5:30
सेनगाव : तालुक्यातील सापडगांव येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना २४ डिसेंबर ...

गोठ्याला आग लागून दोन लाखांचे नुकसान
सेनगाव : तालुक्यातील सापडगांव येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची घटना २४ डिसेंबर राेजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. यामध्ये एक शेळी दगावली असून शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
सापडगांव येथे गुरुवारी मध्यरात्री २. ३० वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हिंमतराव कोंडबाराव अवचार यांचे गावाच्या बाहेर शेतीला लागून राहते घर आहे. त्यांच्या घरासमोरच गुरा वासरांचा व शेतीचे साहित्यं ठेवण्यासाठी गोठा आहे. गुरुवारी रात्री अवचार हे शेतात पिकांना पाणी द्यायला गेले होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक या गोठ्याला आग लागली. आगीची तीव्रता माेठी होती. त्यामध्ये १५ हजार रुपये किंमतीची शेळी दगावली. तर गोठ्यातील शेतीसाहित्य व ४० टिनपत्रे जळाली आहेत. असे एकूण दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या गोठ्यामध्ये एक म्हैस व तिचे बछड होते. त्याना आगीची आस लागली. परंतु सुदैवाने दोन्हीही जनावरे सुखरूप गोठ्याच्या बाहेर पडली. मात्र या आगीत एक शेळी व शेतीसाहित्य जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने संबंधित तलाठ्याला संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी होत आहे.