आंबा येथे पैशांवरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:56+5:302021-04-18T04:28:56+5:30

कुरूंदा : हात उसने घेतलेल्या पैशांवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्री वसमत तालुक्यातील आंबा शिवारात घडली. ...

Two groups fight over money at Mango | आंबा येथे पैशांवरून दोन गटात हाणामारी

आंबा येथे पैशांवरून दोन गटात हाणामारी

कुरूंदा : हात उसने घेतलेल्या पैशांवरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्री वसमत तालुक्यातील आंबा शिवारात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींनंतर ९ जणांविरूद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वसमत तालुक्यातील आंबा येथे हात उसने दिलेल्या, घेतलेल्या पैशांवरून दोन गटात हाणामारी झाली. व्यंकटी मारोतराव भोसले (रा. आंबा) यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत भारत भोसले, आदीनाथ दिलीप भोसले, सतीश भोसले, मनोज भोसले, विवेक भोसले (सर्व रा. आंबा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात हात उसने घेतलेले पैसे परत का करत नाहीस, असे विचारले म्हणून व्यंकटी भोसले व साक्षीदारांना मारहाण झाल्याचे तक्रारी म्हटले आहे. तसेच चंद्रकांत भारत भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोविंद मारोती भोसले, अमोल भोसले, विकास मारोती भोसले, व्यंकटी मारोती भोसले यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल झाला आहे. हात उसने दिलेले पैसे परत मागितले असता, कशाचे पैसे म्हणून चंद्रकांत भोसले यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक जोगदंड करत आहेत.

Web Title: Two groups fight over money at Mango