शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील चौंडी फाट्यावर दोन गट भिडले; तूफान दगडफेक, हाणामारीत एकाचा मृत्यू

By विजय पाटील | Updated: January 24, 2024 13:38 IST

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

हिंगोली: वसमत तालुक्यातील चौंडी फाट्यावर जुनूना गावातील दोन गटांंनी दगडफेक केली. यानंतर येथेच हाणामारीही झाली. या हाणामारीत चाकूचा वार बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती सुस्थितीत आणली.  ही घटना २४ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान घडली. 

जुनुना गावातील वादातून ही घटना घडली असल्याचे यावेळी प्रत्यक्षदर्शीने सांगितले. वेळीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दोन गटाच्या वादात एकाचा मृत्यू झाल्यामुळे भागात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चौंडी फाट्यावर दोन गट आमने-सामने आले. जुन्या वादातून ही घटना घडली. यावेळी शिवीगाळ करीत तुफान दगडफेक करण्यात आली. नेमके झाले काय? कोण कोणाला हाणामारी करत आहे ? हेच कळत नव्हते. या दगडफेकीत राहुल गवळी याच्यावर चाकूचा वार झाला. त्यामुळे तो जागीच मृत्यू पावला. त्यामुळे चोंडी फाट्यावर परिस्थिती तणावपूर्वक बनली होती. बाहेर गावाच्या नागरिकांनी चौंडी फाट्यावर येत भांडण केले आणि नंतर त्या भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाले.

कुरुंदा पोलिस पोहोचले घटनास्थळी...चोंडी फाट्यावर दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. ही माहिती कळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, गजानन मोरे, वाघमारे, गवळी व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी नागरिकांची झाली होती. जुनूना येथील हा जुना वाद जुनाच असून त्यातून एकमेकांना मारण्यापर्यत घटना घडत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली