पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपींचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:39 IST2018-04-02T00:39:45+5:302018-04-02T00:39:45+5:30
पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपीने गोंधळ घाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. सदर घटना वसमत शहरातील रविवार पेठ येथे ३१ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपींचा गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पंगतीच्या कार्यक्रमात दोन मद्यपीने गोंधळ घाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. सदर घटना वसमत शहरातील रविवार पेठ येथे ३१ मार्च रोजी घडली असून याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वसमत शहरातील रविवार पेठ येथे पंगतीच्या कार्यक्रमात दोघेजण दारूच्या नशेत आले. यावेळी त्यांनी विनाकारण आरडा-ओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. याप्रकरणी विलास राठोड यांच्या फिर्यादीवरून गीताराम उर्फ बाळू रामकिशन अडलिंगे, अक्षय राजेश जिंतुरकर दोघे रा. वसमत यांच्याविरूद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारुविक्री वाढली
सध्या ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अधून मधून वाद उद्भवत आहेत.