चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:53 IST2021-02-05T07:53:22+5:302021-02-05T07:53:22+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील १ हजार १७६ बुथवर ० ते ५ वर्षे वयाेगटातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांचे ...

Two drops of life to Chimukalya | चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

चिमुकल्यांना दोन थेंब जीवनाचे

हिंगोली : जिल्ह्यातील १ हजार १७६ बुथवर ० ते ५ वर्षे वयाेगटातील १ लाख ३३ हजार ५८२ बालकांचे ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेत पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाभरात ३१ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरात १ लाख ३३ हजार ५८२ बालकांची संख्या असून यामध्ये १ लाख ४ हजार ३७१ बालके ग्रामीण भागातील तर २९ हजार २११ शहरी भागातील आहेत. पल्स पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात १ हजार १७६ बुथ तयार करण्यात येणार आहेत. तसेच १ लाख ८३ हजार ८२० पोलिओ डोस उपलब्ध झाले आहेत. यासाठी जिल्ह्यातील ८३३ आरोग्य कर्मचारी, २४ पर्यवेक्षक, १ हजार ७० आशा वर्कर, १ हजार २१४ अंगणवाडीसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अधिकाऱ्यांसह ७५ ट्राझिट पथक, ८० मोबाईल पथकाद्वारे यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी वाडी, तांडे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, झोपडपट्टी, कारखाना आदी भागातही विषेश लक्ष ठेवले जाणार आहे. मोहिमेची जय्यत तयारी झाली असून प्रसिद्धीपत्रक, बॅनर, पोस्टर, मार्कर पेन, अहवाल रिपोर्ट, पोलचिट आदी साहित्य यापूर्वीच प्रत्येक लसीकरण केंद्रावर पोहोचती करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

तालुकानिहाय बालकांची संख्या

तालुका ग्रामीण शहरी

औंढा नागनाथ- १७२५९ २१९८

वसमत- २५०१७ १२४३६

हिंगोली- २३११६ १०२०५

कळमनुरी- १७८९४ २३८७

सेनगाव- २१०८५ १९८५

एकूण- १०४३७१ २९२११

लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती

जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयाेगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी लाऊडस्पीकरच्या सहाय्याने जनजागृती केली जात आहे. दर्शनीय भागात फलकही लावण्यात आले आहेत. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे, डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली अशाा, वर्कर, अंगणवाडीसेविका यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी अमोल कुलकर्णी, शेख मुनाफ, डी. आर. पारटकर, श्यामसुंदर जामकर, प्रशांत तुपकरी, कमलेश इशी, बापू सूर्यवंशी आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

जिल्ह्यातील १ हजार १७६ केंद्रांवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसह, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांना प्रशिक्षण देण्यात आले असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

डॉ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Two drops of life to Chimukalya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.