शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चैन स्नॅचिंग करणारे दोन जण एलसीबीच्या जाळ्यात; ३ लाखाचा मुद्देमाल जप्त

By विजय पाटील | Updated: August 17, 2023 19:16 IST

दोन गुन्ह्यांचा झाला उलगडा

- इस्माईल जहागिरदारवसमत (जि. हिंगोली): शहरात मॉर्निंगवॉक व घरापुढील सडासारवण करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. त्या चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस प्रशासनाने तपास पथक नियुक्त केले होते. तपासात नांदेड येथून एलसीबीच्या पथकाने दोन चोरट्यांसह गुन्ह्यातील ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

वसमत शहरात तीन ते चार महिन्यांपूर्वी  बँककॉलनी ते कवठा रोड दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील तसेच १४ ऑगस्ट रोजी अंगणात सडा टाकणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा पंडीत कच्छवे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे  यांच्या नेतृत्वात एक विषेश पथक नेमण्यात आले होते.सदरची कारवाई पोलीस अंमलदार शेख बाबर, पांडुरंग राठोड, विठठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांनी केली. तसेच वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोदणापोड, फौजदार राहुल महीपाळे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, पोउपनि सोनकांबळे, पोशि रवीशंकर बामणे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

नांदेड परिसरात मारला छापापोलीस पथकास वसमत येथिल चैन स्नॅचिंगची गोपनिय माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने शिवनगर नांदेड परिसरात पोलिसांनी छापा मारला. यात संशयित आरोपी राहुल प्रदिप जाधव (वय २२, ऑटोचालक रा.शिवनगर नांदेड) व एक विधीसंघर्षग्रस्त बालकयास ताब्यात घेउन सदर गुन्हयासंदर्भाने विचारपूस केली असता आरोपीने वसमत शहरातील मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने जबरीने चोरल्याचे कबुल केले. त्यामुळे चोरलेला सोन्याचा मुद्देमाल, सोन्याची ३५ ग्रॅम वजनाची चैन व ५ ग्रॅम वचनाचे मंगळसूत्र, मिनिगंठण किंमत २ लाख,४० हजार व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत ६० हजार व मोबाईल असा एकूण ३ लाखाचा मुददेमाल जप्त केला आहे. आरोपीची अधिक विचारपूस केली असता आरोपीवर यापूर्वीचे जबरी चोरीचे अनेक गुन्हे असून हिंगोलीसह, नांदेड, परभणी जिल्ह्यात जबरीचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली