दोन कारची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार

By Admin | Updated: September 17, 2016 23:43 IST2016-09-17T22:08:11+5:302016-09-17T23:43:17+5:30

दोन कारची समोरा-समोर धडक बसल्याने तीन जण जागीच ठार तर सातजण गंभीर जखमी झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली

Two cars hit face to face, three were killed on the spot | दोन कारची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार

दोन कारची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार

विजय पाटील/ऑनलाइन लोकमत

हिंगोली,दि.17- दोन कारची समोरासमोर धडक बसल्याने तीन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. माळहिवरा पाटीजवळून दोन किमी अंतरावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हिंगोली-वाशिम मुख्य महामार्गावर हा अपघात झाला. वाशिमकडून एमएच-३७ -ए- ३७२७ क्रमांकाची कार हिंगोलीकडे येत होती. तर एमएच -३०- एएफ-९६९२ क्रमांकाची कार हिंगोली येथून वाशिमकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. जोरदार धडक बसल्याने अपघातामध्ये सत्यनारायण हजारीमन अग्रवाल (४२, रा. केशवनगर ता. रिसोड, जि. वाशिम), शरद खोटे (३२, रा. चिचांबापेन ता. रिसोड, जि. वाशिम), मधुकर कालापाड (२७, रा. पेडगाव ता. रिसोड जि. वाशिम) यांचा मृत्यू झाला आहे. 

अपघातातील सय्यद हसन सय्यद यासिन, बाळू काळापाडे यांच्यासह सात जण गंभीर जखमी आहेत. जखमी व्यक्ती रिसोड, वाशिम व अकोला येथील असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. 

Web Title: Two cars hit face to face, three were killed on the spot