शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात तुरीचे १२ कोटींची चुकारे लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 17:53 IST

जिल्ह्यात एकूण पाच केंद्रावरुन नाफेडने ६ हजार ३०६ शेतकऱ्यांची ३९ कोटी २१ लाख ९८ हजार ३५० रुपयाची ७१ हजार ९६३  क्विंंटल तूर खरेदी केली आहे.

ठळक मुद्दे २६ कोटी रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असले तरीही अजून बारा कोटी रुपयांचे चुकारे लटकलेले आहेत.  

हिंगोली : जिल्ह्यात एकूण पाच केंद्रावरुन नाफेडने ६ हजार ३०६ शेतकऱ्यांची ३९ कोटी २१ लाख ९८ हजार ३५० रुपयाची ७१ हजार ९६३  क्विंंटल तूर खरेदी केली आहे. मात्र २६ कोटी रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असले तरीही अजून बारा कोटी रुपयांचे चुकारे लटकलेले आहेत.  अधून - मधून पाऊस हजेरी लावत असल्याने, बळीराजा आता शेतीच्या कामाकडे वळला आहे. नाफेड केंद्रावर तूर विकण्याच्या नादात तर अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे रेंगाळलेली आहेत. २५ मेपर्यंत तूर विक्री केल्यानंतर  चुकाऱ्यांच्या प्रतीक्षेत शेतीची कामे आटोपून घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. मुख्य म्हणजे आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला तो खरिपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे खरेदीचा. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नाफेडकडे तूर विक्री केली. मात्र शेवटी पेरणीसाठी पैसेच हाती पडलेले नाहीत.

अजूनही पाचही केंद्रांवरील हजारो शेतकरी चुकाऱ्यांसाठी हैराण आहेत. तर काही शेतकऱ्यांनी यंदाही उसनवारी करुन किंवा नातेवाईकांकडून खते, बियाणांसाठी पैशांची जुळवा-जुळव करण्यास प्रारंभ केला आहे. मात्र खिशात दमडीही नसलेले शेतकरी केवळ खते बियणाच्या दराचा आढावाच घेत आहेत. त्यात भर म्हणजे बहुतांश बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासंमोर खरीप पेरणीचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. तर विशेष म्हणजे नोंदणी केलेल्या २० हजार शेतकऱ्यांची तूर खरेदीच केली नाही. अजून तरी वाढीव मुदत मिळालेली नाही. यातील किती जणांकडे तूर आहे, हेही कळायला मार्ग नाही. तर हरभरा खरेदीला मात्र १३ जूनपर्यंत वाढीव मुदत मिळाली आहे. मात्र पेरणीच्या गडबडीत हरभरा विक्रीसाठी कोणत्या शेतकऱ्याकडे वेळ असेल? हा गंभीर प्रश्चच आहे. 

अशी करण्यात आली खरेदी हिंगोली जिल्ह्यातील ५ ही केंद्रावर ३१ हजार १७५ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून २५ मे पर्यंत केवळ ११ हजार ४ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली आहे. यामध्ये हिंगोली येथील केंद्रावर ७७५ शेतकऱ्याची ११ हजार २४९ क्विंटल, सेनगाव केंद्रावर १७१६ शेतकऱ्याची २३ हजार ४८४ क्विंटल, कळमनुरी केंद्रावर १२७९ शेतकऱ्यांची १४ हजार २११ क्विंटल आणि वसमत येथील केंद्रावर ९९७ शेतकऱ्याची ८ हजार १०८ क्विंटल, तर जवळा बाजार येथील केंद्रावर १५३९ शेतकऱ्यांची १४ हजार ९१० क्विंटल तूर खरेदी केली आहे. 

अशी दिली रक्कमजवळ्यात ८.१२ पैकी ७.६७ कोटी, वसमतला ४.४१ पैकी ७९.८१ लाख, कळमनुरीत ७.७४ पैकी १.८७ कोटी, हिंगोलीत ६.१३ पैकी २.८१ कोटी मार्केटिंग फेडरेशनने अदा केले. १२ कोटींची गरज आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डMONEYपैसाFarmerशेतकरी