पिंपरी (खुर्द )मध्ये चोवीस कोंबड्या दगावल्या .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:28 IST2021-01-21T04:28:04+5:302021-01-21T04:28:04+5:30

आखाडा बाळापूर, जि.हिंगोली : बाळापूरनजीक असलेल्या धांडे पिंपरी (खुर्द) येथे अज्ञात आजाराने २४ कोंबड्या दगावल्या आहेत. बर्ड फ्लू ...

Twenty four hens were slaughtered in Pimpri (Khurd) ..... | पिंपरी (खुर्द )मध्ये चोवीस कोंबड्या दगावल्या .....

पिंपरी (खुर्द )मध्ये चोवीस कोंबड्या दगावल्या .....

आखाडा बाळापूर, जि.हिंगोली : बाळापूरनजीक असलेल्या धांडे पिंपरी (खुर्द) येथे अज्ञात आजाराने २४ कोंबड्या दगावल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याची शंका असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पिंपरी (खुर्द ) गावाच्या त्रिज्येतील १० कि. मी. परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे. बाळापूरच्या उंबरठ्यावर बर्ड फ्लूचे सावट असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी (खुर्द )येथे दोन दिवसांपूर्वी अज्ञात आजाराने २४ कोंबड्या मरण पावल्याचे आढळून आले होते. या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पशू आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिंपरी खुर्द गावाच्या परिसरातील दहा किलोमीटर चौफेर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे .त्याअंतर्गत प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास मनाई करण्यात आली. त्या ठिकाणी खाजगी वाहनेसुद्धा प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणे यांच्या वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा प्रदर्शन इत्यादी बाबी बंद करण्यात आल्या आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. बाळापूर परिसरात अशा प्रकारचे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: Twenty four hens were slaughtered in Pimpri (Khurd) .....