आजारपणामुळे परीक्षेत अपयश येण्याच्या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची हिंगोलीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 13:37 IST2018-02-27T13:36:00+5:302018-02-27T13:37:08+5:30
शहरातील तापडीया इस्टेट येथील बारावीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

आजारपणामुळे परीक्षेत अपयश येण्याच्या भीतीने बारावीच्या विद्यार्थिनीची हिंगोलीत आत्महत्या
हिंगोली : शहरातील तापडीया इस्टेट येथील बारावीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तापडीया इस्टेटमध्ये राहणार्या सोनाली रामलिंग कीर्तनकार या विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. बारावी परीक्षेदरम्यान सोनाली आजारी होती. तरीसुद्धा सोनालीने पेपर दिले. मात्र परीक्षेच्या ऐन कालावधीतच प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बारावीत अपयश येईल, या भीतीपोटी तिने इमारतीवरून उडी घेतली. डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी हिंगोली शहर ठाण्याचे फौजदार तानाजी चेरले यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाली ही मुळ नर्सी नामदेव येथील रहिवासी असून तिचे वडील शेतकरी आहेत. सोनालीच्या शिक्षणासाठी ते हिंगोली येथे राहत होते.