शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत हळदीचे दर २५ टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:42 IST

यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे.

ठळक मुद्देदोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

- विजय पाटील हिंगोली : मागील तीन ते चार वर्षांत पहिल्यांदाच हळदीला नीचांकी दर मिळू लागल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. साडेचार हजारांपर्यंत हळद खाली उतरली असून, तेवढा तर प्रतिक्विंटल शेतकऱ्यांचा लागवड खर्चच आहे. त्यामुळे वर्षभर राबूनही शेतकऱ्यांच्या हाती धुपाटणेच येत आहे. मागील तीन ते चार वर्षांत शेतकऱ्यांना सरासरी सात ते दहा हजारांपर्यंत भाव मिळायचा. मात्र यावर्षी हळद काढणीच टाळेबंदीच्या काळात झाली. ती बाजारात आणताच सुरुवातीला पाच ते साडेपाच हजार व आता चक्क साडेचार हजारांपर्यंत दर घसरला आहे. तुरळक शेतकऱ्यांनाच पाच हजारांवर भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांत हळद खरेदी होते. हिंगोलीत साधारण दोन लाख क्विंटल, वसमतला ४ लाख क्ंिवटल, जवळ्यात एक लाख क्विंटल, सेनगावातही जवळपास ५0 ते ७0 हजार क्विंटल हळदीची आवक होते. ही परिस्थिती मागील दोन-तीन वर्षांतच झाली आहे. यापूर्वी एवढी आवक नसायची. विदर्भातूनही हळद येण्याचे प्रमाण वाढले. उसाची शेती कमी झाल्यानंतर याची जागा बहुतांश ठिकाणी हळदीने घेतली. आवक वाढली तसे दरही घसरत गेले आहेत.

२00८-0९ मध्ये २६ हजारांचा दरपाच वर्षांत हळद पिवळे करून सोडते, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. हा सुवर्णयोग २00८ मध्ये आला होता. हळदीचे दर चक्क २६ हजारांपर्यंत गेले होते. साधारण हळदही १८ ते २0 हजार रुपये क्विंटलने विकली गेली होती. त्यानंतर हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढले. दर मात्र घसरतच गेले.

शेती परवडेल कशी?कुरुंदा येथील शेतकरी विष्णू राजे म्हणाले, आमची तिसरी पिढी हळदीचे उत्पादन घेत आहे. यापूर्वी हळद परवडायची. निम्मा तरी नफा मिळायचा. रासायनिक खत, न्यूट्रियंटस्, खोडअळीसारख्या प्रकारावर फवारणी, निंदण, बेड पद्धतीत वाढलेला लागवड खर्च, ठिबक, काढणीचे वाढलेले दर हे सर्व पाहता प्रतिक्ंिवटल खर्च साडेचार हजारांवर गेला आहे. एकरी पंधरा ते वीस क्ंिवटल उत्पादन होते. दर पाच हजारांच्या आत आल्यावर ही शेती परवडणार कशी, हा त्यांचा सवाल.

... तर भाव वाढेलव्यापारी प्रशांत सोनी म्हणाले, दर आमच्या हातात नसतात. यापूर्वी हळदीचे क्षेत्र कमी होते. आवक कमी असायची. आता क्षेत्र अन् आवक वाढली. गुणवत्ता वाढली नाही. निर्यातही घटली आहे. निर्यातक्षम माल थेट सांगलीला जातो. त्याला दरही चांगला मिळतो. सध्या टाळेबंदीत प्रक्रिया उद्योग बंद आहेत. स्थानिक मजुरांचा खर्च वाढला. टाळेबंदी उठली तर भावात बदल पाहायला मिळू शकेल. दोन-तीन वर्षांत पहिल्यांदाच हळद पाच हजारांच्या खाली उतरली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीagricultureशेती