डिग्रस कऱ्हाळे परिसरात हळद काढणीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:07+5:302021-03-28T04:28:07+5:30
मे - जून २०२० मध्ये हळद लागवडीस प्रारंभ झाला होता. आता हळद पूर्ण परिपक्व झाल्याने परिसरात हळद काढणीस प्रारंभ ...

डिग्रस कऱ्हाळे परिसरात हळद काढणीस सुरुवात
मे - जून २०२० मध्ये हळद लागवडीस प्रारंभ झाला होता. आता हळद पूर्ण परिपक्व झाल्याने परिसरात हळद काढणीस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी शेतमजूर हळद काढणीच्या कामात मग्न असल्याचे दिसतात. तसेच शाळा बंदमुळे मुलेसुद्धा आपल्या आई-वडिलांसोबत हळद काढणीच्या कामात मदत करत आहेत.
हळद हे मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक आहे. रोजच्या आहारात हळदीला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. डिग्रस कऱ्हाळे परिसरातील वातावरण हळद लागवडीस अनुकूल असल्यामुळे या परिसरातील शेतकरी हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी हळदीला चांगला भावही मिळत आहे. अतिपावसामुळे हळद उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. हळद काढणीस उत्पादनाच्या खर्चात ३० ते ४० टक्क्यापर्यंत काढणी व मजुरी खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांतून बाेलल्या जात आहे. फाेटाे नं.