सिनेस्टाईल मोबाइल लांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:11+5:302021-08-21T04:34:11+5:30

हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथील रमेश कुंडलिकराव क्षीरसागर हे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंगोली येथून गावाकडे दुचाकीवर परत ...

Trying to lengthen the cinestyle mobile | सिनेस्टाईल मोबाइल लांबविण्याचा प्रयत्न

सिनेस्टाईल मोबाइल लांबविण्याचा प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथील रमेश कुंडलिकराव क्षीरसागर हे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंगोली येथून गावाकडे दुचाकीवर परत जात होते. सोबत त्यांची मुलगी होती. त्यांची दुचाकी माळहिवरा पाटीजवळील मोंटो कार्लो गेटजवळ आली असता पाठीमागून एमएच ३८ एए ९१९७ क्रमांकाच्या दुचाकीवर तिघे येत होते. त्यांनी त्यांची दुचाकी क्षीरसागर यांच्या दुचाकीबरोबर चालवीत क्षीरसागर यांच्या मुलीजवळील मोबाइल जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रमेश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तराव थोरात (रा. हिरडी), लक्ष्मण नारायण आरे, शेख हुसेन शेख चाँद (दोन्ही रा. माळहिवरा) यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत. या घटनेमुळे एकट्याने दुचाकीवर जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Trying to lengthen the cinestyle mobile