८६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST2021-08-01T04:27:39+5:302021-08-01T04:27:39+5:30

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रभारी पोलीस उपधीक्षक सरदारसिंग ठाकूर ...

Transfer of 86 police personnel | ८६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

८६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रभारी पोलीस उपधीक्षक सरदारसिंग ठाकूर यांच्या अस्थापना मंडळाने ३० जुलै रोजी एकाच ठिकाणी ५ वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात बदलीपात्र कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले हेाते. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक कलासागर यांनी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेत त्यांच्यासमोर पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या पदाची संख्या दर्शविणारा तक्ता ठेवला. त्यांना निवास व पाल्यांच्या शिक्षणासाठी सोयीचे ठरेल, असे ठिकाण मागण्याचे सांगून त्यांना जागेवरच बदली दिली. यामुळे पोलीस अंमलदारांना कर्तव्य बजावण्यासाठी तसेच पाल्यांच्या शिक्षणासाठी सोयीचे ठरणार आहे. आता पुढील टप्प्यात विनंती बदल्या होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

१३ कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

यावेळी सेवानिवृत्ती, वैद्यकीय आदी कारणांमुळे १३ कर्मचाऱ्यांना सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी मुदतवाढ दिली आहे, तर ८६ कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Transfer of 86 police personnel