शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बोगीला आग लागली, पण मॉक ड्रील होती; हिंगोली रेल्वेस्थानकावर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 18:45 IST

अचानक आगीसारखी किंवा अन्य दुर्घटना घडली तर काय करावे, रेल्वेसह इतर यंत्रणा सतर्क आहेत, याची पडताळणी करण्यात आली

हिंगोली : शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रेल्वे बोगीतून अचानक धुराचे लोट उडतात, रेल्वेच्या अपघात राहत पथकासह सर्व संबंधितांना संदेश दिला जातो, सायरन वाजवत शहराच्या मुख्य रस्त्याने अग्नीशमनची गाडी रेल्वेस्थानकावर पोहोचते, पूर्णा येथून अपघात निवारण रेल्वे व इतर पथके दाखल होतात, आग विझविण्याची धावपळ होते. रेल्वेस्थानकाच्या परिसरात बघ्यांची गर्दी जमते. काय झाले, कोणालाच कळत नाही. काही वेळानंतर हे रेल्वेचे मॉक ड्रील (प्रात्याक्षिक) होते, असे समजल्यानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडतो.

अचानक आगीसारखी किंवा अन्य दुर्घटना घडली तर काय करावे, रेल्वेसह इतर यंत्रणा सतर्क आहेत, याची पडताळणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने मंगळवारी सकाळी हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर उभ्या रेल्वेच्या एका बोगीला आग लागल्याचा संदेश रेल्वे प्रशासनातील सर्व विभागांना पाठविण्यात आला.

या प्रात्यक्षिकादरम्यान हिंगोली येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये बंद असलेल्या रेल्वे डब्यामध्ये प्रवासी अडकल्याची माहिती मिळताच अपघात निवारण ट्रेनच्या (एआरटी) साह्याने पूर्णा येथून टीम मदतीसाठी धावली. त्याच वेळी रेल्वे आपत्कालीन नियंत्रण कक्षाची (एनडीआरएफ) टीमही दाखल झाली. दोन्ही टीमने बचाव कार्य सुरु केले तसेच विशेष उपकरणांच्या साह्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. ही पूर्णत: तांत्रिक मॉक ड्रील हिंगोलीच्या रेल्वेस्थानकावर राबविण्यात आली.

तसेच हिंगोली नगरपालिकेच्या अग्नीशमन विभगाला  माहिती मिळताच अग्नीशमनचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. अत्यावश्यक सुविधेत असणाऱ्या इलेक्ट्रीक विभागाचे पथकही दाखल झाले. साधारणत: ९.१५ च्या सुमारास आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर रेल्वेच्या बोगीत असणाऱ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठीचेही प्रात्याक्षिक करण्यात आले.

रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या या प्रकाराविषयी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र काहीच माहिती नव्हती. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह पथकही या ठिकाणी सज्ज होते. दरम्यान काही वेळाने रेल्वेने हे प्रात्याक्षिक घेतले असल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या पथकांनी घेतला सहभागया मॉकड्रीलमध्ये नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाने स्वयंचलित अपघात निवारण गाड्या, ५ वी बटालीयन, एनडीआरएफ ५ आय टीम, कॅरेज ॲण्ड वॅगन कर्मचारी, रेल्वे नागरी सुरक्षा दल, रेल्वे संरक्षण दल, स्काऊट, गाईड, महाराष्ट्र राज्य पोलिस, वैद्यकीय पथक, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन कर्मचारी, विद्युत कर्मचारी, अभियांत्रिकी कर्मचारी, स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन (एसपीएआरएमव्ही) या पथकांनी सहभाग नोंदविला. हिंगोली नगरपालिकेच्या अग्नीशमन विभागातील १० ते १५ कर्मचारी, इलेक्ट्रीक विभागाचे कर्मचारी, महसूलचे कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला.

या अधिकाऱ्यांची उपस्थितीदक्षिण मध्य रेल्वेचे प्रधान सुरक्षा अधिकारी व्यंकट रमणा रेड्डी, मुख्य रोलिंग स्टॉक इंजिनिअर धर्मेंद्र, रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्यासह नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीrailwayरेल्वे