शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वाहतूक शाखेची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:16 IST

सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी देऊन टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सामान्यांना त्रास न होता हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याची मोहीम पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी हाती घेतली आहे. फॅन्सी नंबर प्लेट, ओव्हर स्पीड, महाविद्यालयीन परिसरात नाहक घिरट्या घालणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असा आदेशच त्यांनी देऊन टाकला.वाहतूक शाखेच्या कार्यालयात योगेशकुमार यांनी आज वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्थापन केलेल्या विविध पथकांच्या प्रमुखांसह कर्मचाºयांची बैठक घेतली. ते म्हणाले, सामान्यांना सहसा पोलीस ठाण्याशी कोणतेच काम पडत नाही. ते ठाण्यात कधी कामानिमित्तच आले तर येतात. माहितीसाठी तर कोणीच येत नाही. मात्र प्रत्येक सामान्याचा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयाशी संबंध येतो. कोणत्याही जिल्हा, राज्य व देशाची ओळखही तेथील वाहतुकीच्या शिस्तीवरून होते. आपल्याकडेही या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. नियमांचे पालन करणाºयांना त्रास न होता ही मोहीम राबवायची आहे. यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे, सुसाट वेगाने वाहन चालविणारे, वाहनाचे आरसी बूक नसणारे, शाळा, महाविद्यालय परिसरात नाहक घिरट्या घालणारे कारवाईतून सुटता कामा नये. यात कोणाचीही गय करू नका. मात्र हे सगळे करताना कुटुंबियांसह व्यवस्थितपणे जाणाºयांवरही पोलिसींग होता कामा नये. पोलिसांची प्रतिमा उजळ होईल अशा पद्धतीचे काम यातून अपेक्षित आहे. एकेरी वाहतुकीचे नियम मोडणाºयांनाही धडा शिकवा, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार म्हणाले, वाहतुकीचे नियम तोडल्यास चालविण्याचा परवानाही रद्द करता येते. यात दारू पिऊन वाहन चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, अतिवेगात वाहन चालविणे अशा प्रकारच्या बाबींवर कारवाई करता येते, असे त्यांनी सांगितले.या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक अब्दूल गणी खान, पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, उदयसिंह चंदेल, सुडके, किशोर पोटे, फौजदार विनायक लंबे, सुभान केंद्रे, काशीद आदींची उपस्थिती होती. कर्मचाºयांचीही मोठी उपस्थिती होती.पहिल्याच दिवशी १४१ प्रकरणेयामध्ये पोनि जगदीश भंडरवार, उदयसिंग चंदेल, अंगद सुडके पोउपनी सुभान केंद्रे, विनायक लंबे व जवळपास ५0 कर्मचाºयांची पाच पथके तयार केली. एका पथकाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली. उर्वरित पथकांनी मोटर वाहन केसेस केल्या. त्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट, विना रजिस्ट्रेशन व इतर मोटर वेहिकल अ‍ॅक्टप्रमाणे एकूण १४१ प्रकरणांमध्ये ४६ हजार ८00 रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शिस्त लागेपर्यंत नियमित चालणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस