वाहतुकीस अडथळा; १२ वाहनांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:24 IST2018-12-01T00:23:54+5:302018-12-01T00:24:13+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार बसस्थानक परिसरामध्ये वाहतूकीची रहदारीत अडथळा करणाऱ्या अकरा पॅजो अॅटोसह एका कमांडर जीपवर कार्यवाही जवळा बाजार दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.

वाहतुकीस अडथळा; १२ वाहनांना दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार बसस्थानक परिसरामध्ये वाहतूकीची रहदारीत अडथळा करणाऱ्या अकरा पॅजो अॅटोसह एका कमांडर जीपवर कार्यवाही जवळा बाजार दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-यांनी केली आहे.
जवळा बाजारसह स्थानक परिसरामध्ये नेहमीच वाहतूकीस अडथळा होत असून वारंवार वाहतूक होत आहे. सध्या कारखान्याच्या ऊसाच्या गाड्यासह अवैध वाहतूक करणारे वाहने रस्त्यावरच उभे राहत असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी रस्ता बंद होत असल्यामुळे नागरिकांसह दुकानदार रस्त्यावरून जाणाºया वाहनांना त्रास होत आहे. त्यामुळे हट्ट्याचे सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोना सचिन शिंदे, अरविंद गजभार, सचिन चाबुकस्वार, विशाल काळे, कदम, संदीप बोचरे सह पोलीस कर्मचाºयांसाठी या बारा वाहनांवर कार्यवाही केली आहे.
यामध्ये आॅटो क्र. एमएच ३८- ४४१३, एमएच ३८-७२९१, एमएच २२, एच ४९०९, एमएच ३८-४७८०, एमएच ३८-३१३५, एमएच २२ यू ३९८२, एमएच २२ व्ही. ०८६०, एमएच २६ के. ३१७६, एमएच १२ एन ३१४९, एमएच ३८- १८२६ सह कमांडर जीप एमएच २६- के. ३९७६ या वाहनांवर भादंवि २८३ याप्रमाणे आॅॅटोचालक व जीप चालकांवर गुन्हा दाखल केला असून औंढा नागनाथ न्यायालयात या वाहनांना दंड होणार आहे.