भरचौकात मद्यपीच्या राड्यामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST2021-06-21T04:20:36+5:302021-06-21T04:20:36+5:30

कोणतीच शुद्ध नसलेला बालाजी सीतांबर डंके (रा.शिवाजीनगर) हा मद्यपी चौकात आल्यानंतर आधी एक टिप्पर अडविला. भाऊ दादा आहे, मला ...

Traffic jam in Bharchowk due to drunkenness | भरचौकात मद्यपीच्या राड्यामुळे वाहतूक ठप्प

भरचौकात मद्यपीच्या राड्यामुळे वाहतूक ठप्प

कोणतीच शुद्ध नसलेला बालाजी सीतांबर डंके (रा.शिवाजीनगर) हा मद्यपी चौकात आल्यानंतर आधी एक टिप्पर अडविला. भाऊ दादा आहे, मला मारून टाक असे जोरजाेरात ओरडत तो अंगावर ट्रक घाल असे म्हणून समोरून हटायला तयार नव्हता. पाच ते सहा मिनिटे हा खेळ चालला. मात्र, दुसऱ्या बाजूने वाहतूक जात होती. नंतर एका बससमोर उभा राहिला. तोपर्यंत तेथून दोन पोलीस कर्मचारी गेले. मात्र, कुणीच त्याला रस्त्याबाहेर केले नाही. त्यानंतर एक ज्येष्ठ पोलीस कर्मचारी तेथून जात असताना त्यांनी या मद्यपीला बसच्या बाजूला केले, तर तो त्यांच्या अंगावरही जात होता. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर तो चौकात एका जीपसमोर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांचे वाहन आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवत या मद्यपीला वाहनात टाकून फौजदार गंगाधर बनसोडे, गणेश लेकुळे, उमेश जाधव आदींनी शहर पोलीस ठाण्यात नेले, तर तेथेही दोन तास तो नुसता ओरडत होता. नावही सांगायला तयार नव्हता. त्याच्यासाठी कोणी पोलीस ठाण्यातही आले नव्हते. त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याची नशा उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही फायदा झाला नाही.

Web Title: Traffic jam in Bharchowk due to drunkenness