जीएसटीमधील जाचक तरतुदीच्या विरोधात २६ फेब्रुवारीला व्यापारी बंद पाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST2021-02-22T04:18:40+5:302021-02-22T04:18:40+5:30
हिंगोली : जीएसटीमधील जाचक अटी आणि त्यातील तरतुदीमुळे व्यापाऱ्यांची हेळसांड तर होतेच, त्याचबरोबर आर्थिक नुकसानही होत आहे. याच्या ...

जीएसटीमधील जाचक तरतुदीच्या विरोधात २६ फेब्रुवारीला व्यापारी बंद पाळणार
हिंगोली : जीएसटीमधील जाचक अटी आणि त्यातील तरतुदीमुळे व्यापाऱ्यांची हेळसांड तर होतेच, त्याचबरोबर आर्थिक नुकसानही होत आहे. याच्या विरोधात २६ फेब्रुवारी रोजी सर्व व्यापारी बंद पाळणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
इन्स्पेक्टर राज, जीएसटी विभागाचा ‘हम करोसो कायदा’ या प्रवृत्तीविरुद्ध तसेच जीएसटी कार्यालयाच्या चुकीमुळे त्याचा फटका छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांना बसत आहे. या विरोधात २६ फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या किरकोळ व्यापाऱ्यांच्या देशपातळीवरील एकमेव असलेल्या संघटनेने ‘संपूर्ण भारत बंद’चे आयोजन केले आहे. तसेच जाचक अटी व तरतुदींचा पुनर्विचार करून सरळीकरण करण्यात यावे, ही मागणी केली आहे. भारत बंदमध्ये कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संलग्नित हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स संघटना प्रणीत हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ त्यात सहभागी होणार आहे.
२६ फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्र टँकर मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर अँड कॉमर्स अशा सर्वच लहान-मोठ्या संघटना सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे म्हटले आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीत मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. २६ रोजीच्या भारत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे ठरले. मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स हिंगोली जिल्हाध्यक्ष माजी आ. गजानन घुगे यांची भेट कैलाशचंद्र काबरा, प्रशांत सोनी यांनी घेतली. त्यांच्या संघटनेने बंदमध्ये सहभागी हाेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटनेचा या बंदला पाठिंबा असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पतंगे यांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार पेठांना भेटी देऊन बंदमध्ये सहभागी होण्याकरिता बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
बैठकीपूर्वी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक शिवजन्मोत्सवाला भेट देऊन शिवप्रतिमेला वंदन केले. या बैठकीला नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवानी, कैलाश काबरा, दिलीप चव्हाण, सुमित चौधरी, प्रशांत सोनी, मधुर भन्साळी, प्रवीण सोनी, संजय देवडा, ओम नैनवाणी, पंकज सोनी, सी. ए. अमीर कुंदा, अनुप कंदी, रजनीष पुरोहित, सचिन लखोटीया, महेश मोकाटे, पंकज अग्रवाल, सय्यद अजमल, ललीत चंदनानी, राजेश चंदनानी, सागर संघई, प्रशांत मुंदडा, पंकज दुबे, दिनेश चौधरी, अभिजित डुब्बेवार, शाम खंडेलवाल, अक्षय गुंडेवार, पंकज वर्मा, पवन राठी, सचिन गुंडेवार, श्रीकांत जोशी, नागेश देवके, गोविंद झंवर, सागर दुबे, दयाल यादव, सुमित चांडक, झुनझुनवाला, राजदत्त देशमुख सहभागी होते.
फोटो ६ नंबर