एका एकरात तीन लाख रूपयांचे टोमॅटो उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:31+5:302020-12-29T04:28:31+5:30
कळमनुरी : येथून जवळच असलेल्या कनका येथील एका शेतकऱ्याने एका एकरात तीन लाखांचे टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे. कनका ...

एका एकरात तीन लाख रूपयांचे टोमॅटो उत्पन्न
कळमनुरी : येथून जवळच असलेल्या कनका येथील एका शेतकऱ्याने एका एकरात तीन लाखांचे टोमॅटोचे उत्पन्न घेतले आहे.
कनका येथील शेतकरी रमेश काटकर यांनी एका एकरात जून महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली. अडीच महिन्यांत हे पीक विक्रीसाठी प्राप्त झाले. यासाठी ५० हजार रुपये खर्च आलेला आहे. या खर्चामध्ये फवारणी, कोळपणी, मजुरी, टोमॅटो सुतळीने बांधणी आदी खर्चाचा समावेश आहे. काटकर यांनी कळमनुरी येथे टोमॅटोची विक्री केली. या विक्रीतून त्यांना दररोज रोख रक्कम मिळत होती. एका एकरात पाच महिन्यांत त्यांना तीन लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. टोमॅटोच्या उत्पन्नातून बऱ्यापैकी उत्पन्न आल्याची माहितीही रमेश काटकर यांनी दिली. यापुढे दरवर्षी टोमॅटोची लागवड करून आर्थिक उत्पन्न जास्त मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.