लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी रिंगण सोहळा हिंगोलीनगरीत ४ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत रामलीला मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे.सदरील पालखीचे राजा अग्रसेन चौक येथे आगमन झाल्यानंतर स्वागत होईल. इंदिरा नगर, नगर परिषद जवळून, रामलिला मैदान येथे भव्य रिंगण सोहळा व संत मारोती महाराज दस्तापूरकर यांचे नातू हभप कृष्णा महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन होणार आहे. हिंगोलीवासीयांनी सदरील पालखी रिंगण सोहळ्यास सहकुटूंब हजर राहून संत नामदेव महाराज पालखी दर्शन, रिंगण सोहळा, कीर्तन व आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी केले आहे.पालखीचे प्रस्थाननर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचे आज उत्साहात प्रस्थान झाले. मात्र गाव प्रदक्षिणा केल्यानंतर या पालखीचा नर्सी नामदेव येथेच मुक्काम असतो. त्यानंतर बुधवारी सकाळी ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. ही पालखी हिंगोलीत पोहोचल्यावर रिंगण व मुक्काम राहणार आहे.
संत नामदेवांच्या पालखीचे आज रिंगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:43 IST