शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून दिसणार

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: November 8, 2022 13:28 IST

मागच्या १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असून हे भारतातही दिसणार आहे.

हिंगोली: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज कार्तिक पौर्णिमेला खंडग्रास स्थितीत होणार आहे. हे चंद्रग्रहण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाहता येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औधकर यांनी दिली.

मागच्या १५ दिवसांत होणारे हे दुसरे ग्रहण असून हे भारतातही दिसणार आहे. उत्तर, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागरात देखील दृश्यमान होणार आहे. यावेळी चंद्रग्रहण सुरु असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवणार आहे. त्यामुळे या ग्रहणाला 'ग्रस्तोदित' चंद्रग्रहण असेही म्हंटले आहे.

चंद्रग्रहण काही उपकरणांचा आधार न घेता पाहणे शक्य होणार आहे. त्यामुळे डोळ्यांना आनंद मिळणार आहे. हे चंद्रग्रहण प्रथम नांदेड, नंतर हिंगोली येथे सायंकाळी ५:४२ वाजता तर सर्वात शेवटी औरंगाबाद येथे सायंकाळी ५:५० वाजता चंद्रोदयग्रहण स्थितीतच होईल. आपल्याकडे ग्रहण कमाल ग्रासण्याची वेळ ही ५:५७  वाजता असणार आहे. यावेळेस पृथ्वीच्या दाट छायेत चंद्र साधारणत: नांदेड व हिंगोली येथे सर्वात जास्त ५२ टक्के तर औरंगाबाद येथे सर्वात कमी ३३ टक्क्याने ग्रासलेला पहायला मिळेल. सायंकाळी ६:१९ दरम्यान चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीतून विरळ छायेत प्रवेश करणार आहे. सायंकाळी  ७:२६ वाजता ग्रहण समाप्ती होणार आहे.

औरंगाबाद येथे ग्रहण दर्शन...ग्रस्तोदित चंद्रग्रहण दर्शन या खगोलीय उपक्रमाचे आयोजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत गोगाबाबा टेकडीवरून केले  जाणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली