आजपासून घरगुती वीजबिल वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:07 IST2018-02-14T00:07:30+5:302018-02-14T00:07:33+5:30
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.

आजपासून घरगुती वीजबिल वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.
महावितरणने सर्वांत आधी कृषीपंपांची वसुली मोहीम ऐन रबी हंगामाच्या तोंडावर हाती घेतली होती. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीनला भाव नसतानाही ते विकून थकबाकी भरावी लागली होती. त्यातही पाच ते सहा कोटीच वसूल झाले होते. त्यानंतर पुन्हा महावितरणने वसुलीसाठी आदेश दिल्यानंतरही काम होत नसल्याने काही वरिष्ठ अधिकाºयांवरच कारवाईचा बडगा उगारला. त्याचा परिणाम म्हणून आता पुन्हा पाणीपुरवठा, पथदिवे, उद्योगांची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मागील चार-पाच दिवसांपासून यावरून रणकंदन सुरू आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची मिळून जिल्ह्यात जवळपास ८६ कोटींची थकबाकी आहे. कळमनुरी, सेनगावची पाणीपुरवठ्याची वीज जोडली. मात्र सगळीकडे पथदिवे बंद असल्याने शहरे व गावे अंधारात आहेत. अनेक पाणीपुरवठा योजनाही बंदच आहेत. त्यातच आता घरगुती वापराच्या एक लाख ३ हजारपैकी जवळपास ७0 हजार ग्राहकांकडे थकबाकी असल्याने सर्व अभियंते व कर्मचाºयांची वसुलीसाठी पथके नेमली आहेत. ३0 कोटी रुपये थकबाकी असून थकबाकी न भरल्यास थेट जोडणी तोडण्यास आदेशित केले आहे. त्यामुळे आता घरेही अंधारात बुडण्याची भीती आहे.
कळमनुरी : अनेक गावांत पाणीटंचाई
कळमनुरी : महावितरणची पाणीपुरवठा, पथदिव्यांची न.प.व ग्रामपंचायतीकडे १९ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून वसुलीसाठी जोडण्या तोडल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनांनी यांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने न.प. २५ गाव पाणीपुरवठा
मोरवाडी व १६३ नळ योजनेची वीज कनेक्शन तोडले आहे. न.प.च्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन जोडले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची थकबाकी वसूल होणार आहे. कळमनुरी शहरासह ग्रामपंचायती मिळून १७० पथदिव्यांचे वीज कनेक्शन आहे.
कळमनुरी तालुक्यात पथदिव्याचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. या पथदिव्याची ११ कोटी ८१ लाख ९३ हजार रुपयाची थकबाकी आहे. ९९ पथदिव्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.