आज वसमतमध्ये ‘अप्सरा आली’ लावणी शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:22 IST2018-01-23T00:22:09+5:302018-01-23T00:22:15+5:30

येथील सखीमंच सदस्यांसाठी लावणी साम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लावणी कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वसमत येथे आयोजित केला आहे.

 Today the 'Apsara arrived' plantation show in Vasamat | आज वसमतमध्ये ‘अप्सरा आली’ लावणी शो

आज वसमतमध्ये ‘अप्सरा आली’ लावणी शो

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील सखीमंच सदस्यांसाठी लावणी साम्राज्ञी अर्चना सावंत यांचा लावणी कार्यक्रम २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वसमत येथे आयोजित केला आहे.
वसमत येथील हॉटेल व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात होणा-या या कार्यक्रमासाठी सखीमंच सदस्यांनी जय्यत तयारी केली आहे. यावर्षी वसमतमध्ये सखीमंचची विक्रमी नोंदणी होणार आहे. २०१८ च्या नवीन वर्षातील नाव नोंदणी करणाºया सदस्यांना या लावणी कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी येथील नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या सदस्यांना ६०३ रुपयांचा पॅन व तीन डब्यांचा सेट मिळणार आहे. सोबत जागर स्त्री शक्तीचा ही पुस्तिका आणि आकर्षक सखीमंच ओळखपत्र मिळणार आहे. वसमतमधील सदस्यांना भाग्यवंत सोडतीद्वारे १० साडी, १० मायक्रोप्लेटींग सेट, १० डिझायनर ईअर रिंग, २ मंदिर २ चौरंंग पाट सेट, ५ सेल्फी स्टिक, ५ लेडिज पाऊच ५ मोबाईल पावर बँक अशा प्रकारची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी तसेच वाढदिवसानिमित्त फ्रूट फेशियल, हेअर कट, गोल्ड ब्लिच, हॅण्ड वॅक्सींग, दंत तपासणी व एक्स-रे मोफत, ८ बाय ६ आकाराचा फोटो अशा प्रकारच्या मोफत सेवा व सुविधा मिळणार आहेत. कार्यक्रमस्थळी सखी मंच २०१८ ची सभासद नोंदणी सुरू राहील. कार्यक्रमामध्ये सखींना २०१८ चे सखी मंच ओळखपत्र आवश्यक. सखी मंच ओळखपत्राशिवाय कार्यक्रमामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

Web Title:  Today the 'Apsara arrived' plantation show in Vasamat