प्रवासी निवाऱ्याची टीनपत्रे लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:01+5:302021-07-11T04:21:01+5:30

या मार्गावरील प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील प्रवासी वर्गांची मोठी गैरसोय दूर झाली. सध्या पावसाचे दिवस असल्याने ...

The tin sheets of the passenger shelter lengthened | प्रवासी निवाऱ्याची टीनपत्रे लांबविली

प्रवासी निवाऱ्याची टीनपत्रे लांबविली

या मार्गावरील प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे गावातील प्रवासी वर्गांची मोठी गैरसोय दूर झाली. सध्या पावसाचे दिवस असल्याने हा प्रवासी निवारा प्रवाशांसाठी सोयीचा ठरत होता. परंतु शुक्रवारी रात्रीला या दोन्ही प्रवासी निवाऱ्यावरील टीनपत्रे चोरट्यांनी लांबविले आहे. यामुळे गावातील प्रवाशांना पावसाळ्यात पुन्हा गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे.

सध्या गावात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने चाेरट्यांना माेकळीक मिळत आहे. यामुळे पाेलिसांनी रात्रीची गस्त घालत चाेरट्यांवर वचक निर्माण करणे गरजेचे आहे.

फाेटाे नं. २२

Web Title: The tin sheets of the passenger shelter lengthened