शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
3
Sukanya Samriddhi Yojana Calculator: 'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
4
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
5
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
6
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
7
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
8
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
9
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
10
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
12
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
13
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
14
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
15
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
16
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
17
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
18
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
19
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
20
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात २२ वर्षांनी दिसला वाघोबा; पाच शेतकऱ्यांवर केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:43 IST

वन विभागाने शेतकऱ्यांना दिला सावधानतेचा इशारा

ठळक मुद्देकिनवट तालुक्यात खरबी जंगलात १९९७ च्या  जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात व्याघ्रराजाचे दर्शन झाले होते.

हिंगोली : जिल्ह्यातील कलगाव, लिंबी शिवारात वाघाने धुमाकूळ घालत चार गायी फस्त केल्याची घटना ताजी असतानाच सेनगाव तालुक्यात पाच शेतकऱ्यांवर शनिवारी (दि.२ )  दुपारी वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या भागात वाघाच्या पावलाचे ठसे आढळल्याचे सांगून उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी यास दुजोरा दिला असून, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे सुमारे बावीस वर्षांनंतर प्रथमच मराठवाड्यात वाघाचे अस्तित्व जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात वाघाचे आगमन होण्याची ही प्रथमच घटना असल्याची  माहिती उपविभागीय वन अधिकारी केशव वाबळे  यांनी दिली. या वाघाने बुधवारी लिंबी येथील श्रीराम मारुती बेले यांची गाय मारली. खातरजमा करण्यासाठी त्या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तेथे वाघाचे पंजे आढळून आल्याने तो बिबट्या नसून वाघच असल्याचे स्पष्ट झाल्याचे वाबळे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी वन विभागाची यंत्रणा वाघाचा शोध घेत असताना कलगाव येथील शेतकरी बाबूराव शकूराव पौळ यांच्या तीन गायी शेतात वाघाने मारून खाल्ल्याचे दिसून आले. 

सेनगावात शेतकऱ्यांवर हल्लाजिल्ह्यातील कलगाव, लिंबी शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून त्याने आत्तापर्यंत चार गई फस्त  केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. सदर वाघाचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत असताना या घटनास्थळापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सेनगाव तालुक्यातील सूकळी खु शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना वाघ निदर्शनास आला. या वेळी डरकाळी फोडत वाघ आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच भगवान शिरसाट,केशव खिलारी ,रमेश आठवले हे शेतकरी सोयाबीन सुडीचा गंजीवर चढले. परंतु, या वेळी काही अंतरावर असलेल्या सुनील श्रीराम कबाडे (२६) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सुनीलसह इतर शेतकऱ्यांनी आराडाओरड सुरु केला. मात्र तोपर्यंत सुनीलयास गंभीर जखमी करून वाघ पसार झाला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी शेतकरी ,ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळी वनविभागाचे उपविभागीय अधिकारी केशव वाबळे ,सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी जि.पी.ढगे,वनपाल एम.व्ही.जावडे,वनरक्षक एम.जी.कुऱ्हा यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. परिसरात आढळले ढसे हे वाघाचेच असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे यांनी सांगितले. सदर वाघ हिगोली तालुक्यातील  कलगाव,लिंबी, खंडाळा शिवारात  धुमाकूळ घालून या परिसरात आला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

प्रदीर्घ कालावधीनंतर...या संदर्भात औरंगाबादचे निवृत्त वन अधिकारी रवींद्र धोंगडे यांनी सांगितले की, १९७२ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात गौताळा येथील औट्रम घाटात चाळीसगावचे प्रसिद्ध शिकारी डॉ. पूर्णपात्रे यांनी वाघ मारला होता. (त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती.) त्यानंतर नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवरील पैनगंगेजवळ किनवट तालुक्यात खरबी जंगलात १९९७ च्या  जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात व्याघ्रराजाचे दर्शन झाले होते. त्यानंतर आताच मराठवाड्यात वाघ आल्याची चिन्हे आहेत.

रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी  शेतात मुक्काम करण्याचे टाळावे, तसेच परिसरात एकट्याने फिरताना काळजी घ्यावी.- केशव वाबळे, उपविभागीय वन अधिकारी   

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागHingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडा