शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली-नांदेड महामार्गावर थरार! १२० फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरनला पेट; वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 18:54 IST

हिंगोली-नांदेड महामार्गावर ‘बर्निंग ट्रक’चा थरार; आग कंटेनरमधील फ्रीजपर्यंत पोहोचली असती तर मोठा धोका निर्माण झाला असता

- विश्वास साळुंकेवारंगा फाटा (जि.हिंगोली) : हिंगोली ते नांदेड या महामार्गाने जात असलेल्या एका भल्या मोठ्या कंटेनरने ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली. ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दिल्लीहून चेन्नईकडे हा ट्रक निघाला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हिंगोली मार्गे नांदेडकडे जात असताना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दाती पुलावर या कंटेनर असलेल्या ट्रकने (आरजे १४/जीएन ३०३७) पेट घेतला. या कंटेनरमध्ये सुमारे १२० फ्रीज (रेफ्रीजरेटर) होते. कंटेनरच्या समोरील बाजूस चालकाच्या केबिनने अचानक पेट घेतला. या घटनेनंतर हा कंटेनर रस्त्याच्या पलीकडील बाजूस आडवा झाला. हेमंतकुमार कुंवर पालसिंग राजोरा (३८, रा.बुलंद, उत्तरप्रदेश) हा या ट्रकचा चालक आहे.   दरम्यान, घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस, आखाडा बाळपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रस्त्याच्या कडेलाच पेटलेला कंटेनर असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्ध्या तासापासून ठप्प पडली होती.

तर वाढला असता धोकाया कंटेनरच्या कॅबिनमध्ये आग लागली होती. ही आग पाठीमागील बाजू असणाऱ्या कंटेनरपर्यंत पोहोचली तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कारण कंटेनरमध्ये १२० फ्रीज असून, आगीने या फ्रीजचा स्फोट होऊ शकतो. हिंगोली, कळमनुरी येथून अग्नीशमन बंबांना पाचारण केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli-Nanded Highway: Container carrying 120 refrigerators catches fire, traffic halted.

Web Summary : A container truck transporting 120 refrigerators caught fire on the Hingoli-Nanded highway near Waranga Phata, halting traffic. The driver escaped unharmed, but the fire threatened to spread, prompting a fire brigade response.
टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात