हिंगोलीत तीन नवे पोलीस निरीक्षक; एकाची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:01+5:302021-08-20T04:34:01+5:30

प्रशासकीय बदलीत नांदेडहून सुनील निकाळजे विनंती बदलीत विश्वनाथ झुंजारे व चंद्रशेखर कदम असे तीन पोलीस निरीक्षक हिंगोली जिल्ह्यात ...

Three new police inspectors in Hingoli; Replacement of one | हिंगोलीत तीन नवे पोलीस निरीक्षक; एकाची बदली

हिंगोलीत तीन नवे पोलीस निरीक्षक; एकाची बदली

प्रशासकीय बदलीत नांदेडहून सुनील निकाळजे विनंती बदलीत विश्वनाथ झुंजारे व चंद्रशेखर कदम असे तीन पोलीस निरीक्षक हिंगोली जिल्ह्यात येत आहेत. तर हिंगोलीहून अंगद सुडके हे लातूरला गेले आहेत. सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये नांदेडहून आरुण नागरे व परभणीहून हनमंत पांचाळ हे हिंगोलीत येत आहेत. तर हिंगोलीतून बळीराम बंदखडके यांची परभणीत बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये नांदेडहून नमिता देशमुख, विक्रम विटुबोने, शालिनी गजभारे यांची हिंगोलीत बदली झाली. तर परभणीहून संतोष मुपडे हिंगोलीत येत आहेत. हिंगोलीतील ज्ञानोबा मुलगीर यांची नांदेडला तर साईनाथ अनमोड यांची परभणीला बदली झाली आहे. फौजदारांच्या विनंती बदल्यांमध्ये नांदेडहून पंडित थोरात, परभणीहून सतीश तावडे व सदानंद मेंडके हिंगोलीत येत आहेत. हिंगोलीतून संदीप थडवे यांची नांदेडला बदली झाली आहे.

Web Title: Three new police inspectors in Hingoli; Replacement of one