जिल्ह्यात तीन नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:20 IST2021-06-20T04:20:56+5:302021-06-20T04:20:56+5:30

हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटिजन चाचणीत ४९५ पैकी एकही बाधित आढळला नाही. यात हिंगोली ९५, वसमत ४८, सेनगाव ९३, औंढा ...

Three new corona patients in the district | जिल्ह्यात तीन नवे कोरोना रुग्ण

जिल्ह्यात तीन नवे कोरोना रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात रॅपिड अँटिजन चाचणीत ४९५ पैकी एकही बाधित आढळला नाही. यात हिंगोली ९५, वसमत ४८, सेनगाव ९३, औंढा ४१, कळमनुरी २१८ अशा चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये हिंगोली परिसरात ११६ पैकी श्रीकृष्णनगर १ व जिजामातानगर १ असे दोन रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात ६२ पैकी जमजम कॉलनीत एक रुग्ण आढळला. औंढ्यात १०८ व वसमतला ३५ पैकी एकही बाधित नाही. बरे झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातून ५ तर लिंबाळा येथून एकास घरी सोडले.

आजपर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९०२ रुग्ण आढळले. यापैकी १५ हजार ४७६ जण बरे झाले. ३७९ जणांचा मृत्यू झाला, तर सध्या ४७ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ४ जण अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: Three new corona patients in the district